कुत्र्याचा पाठलाग करीत बिबट्या घरात; झोपेतच पती-पत्नीवर झडप
मूल (चंद्रपूर) : कुत्र्याचा पाठलाग करीत
आलेल्या बिबट्याने थेट घरात घुसून झोपेत असलेल्या पती-पत्नीवर झडप घातल्याची थरारक घटना रविवारी मध्यरात्री मूल तालुक्यातील डोणी येथे घडली. या हल्ल्यात आत्माराम शामराव नैताम (४५) आणि त्यांची पत्नी अर्चना आत्माराम नैताम (४२) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांवर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
रविवारी रात्री सुमारे बारा वाजता बिबट्या डोणी गावात शिरला. आत्माराम नैताम यांच्या घराच्या अंगणात कुत्रा बसला होता. त्याच्या शिकारीसाठी बिबट्याने कुत्र्याचा पाठलाग सुरू केला. जीवाच्या आकांताने कुत्र्याने थेट नैताम
आत्माराम नैताम
यांच्या घरात धाव घेतली. त्याच्या मागोमाग बिबटचानेही घरात प्रवेश केला. घरात पती-पत्नी गाढ झोपेत असताना अचानक समोर बिबट्या दिसल्याने दोघांचीही भंबेरी उडाली. काही कळण्याच्या आतच बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. आत्माराम आणि अर्चना यांच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर तसेच शरीराच्या अन्य भागांवर बिबटचाच्या
अर्चना नैताम
पंजांचे आणि नखांचे खोल व्रण झाले.
बिबट्याच्या अचानक हल्ल्याने घरात एकच गोंधळ उडाला. जखमी दाम्पत्याच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. त्यांचा आवाज ऐकताच शेजारी आणि ग्रामस्थ मदतीसाठी धावले. घराबाहेर नागरिकांच्या गर्दीचा आवाज येताच बिबट्याने घरातून बाहेर पडत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी दाम्पत्याला तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमा गंभीर असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, गावात बिबट्याचा वाढता वावर आणि थेट घरात घुसून झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडतानाही नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून गाव परिसरातील गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!