शालेय मुलीची चालत्या गाडीवर छेड काढणाऱ्या आरोपीला अटक

२४ तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

टेमुर्डा येथील घटना

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - पोलीस स्टेशन शेगाव बु हद्दीतील टेमुर्डा येथील शाळकरी मुलीला लिफ्ट देतो असे म्हणत गाडीवर बसविले आणि आरोपीने चालत्या  गाडीवर तिची छेड काढण्यास सुरवात केली. शाळकरी मुलगी घाबरली व तिने चालत्या गाडीवरून उडी घेत आपला जीव वाचवला पण तिला दुखापत झाली असून अज्ञात आरोपी गाडी चालक तिथून पडून गेला. फिर्यादीने  त्या अंतर्गत शेगाव पोलीस स्टेशन येथे अपराध क्र.२६५/२०२६ कलम ७४ वी.एन.एस.सह कलम १२ वा. ल.अ. प्र.कायदा २०१२ अन्यये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यात शेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कोणतीही माहिती नसताना टेमुर्डा-वरोरा तसेच इतर ठिकाणी आरोपीचा शोध घेऊन सर्व तांत्रिक बाबी तपासून व खबरी कडून माहिती घेत अत्यंत कोशल्यपूर्ण तपास करून २४ तासाच्या आत अज्ञात आरोपीचा शोध लावला. गणेश बाळुराम कुमावत वय ३४ वर्ष ह.मु. बोर्डा त.वरोरा राह.वासडी खुर्द जिल्हा जयपूर राज्य राजस्थान याला ताब्यात घेऊन आरोपीला सदर गुन्हबाबत सखोल विचारपूस केली असता आरोपी याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी यांच्या कडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी गाडी जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली.सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि. योगेंद्रशिग यादव  ठाणेदार पोलीस स्टेशन शेगाव पोउपनी दिलीप पोले, सुमित कांबळे,दिलीप सूर पो.हवा अविनाश तुरांनकर,दिनेश ताटेवार, पो.शी प्रशांत गिरडकर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!