टॉवर आहे नावाला.. रेंज नाही गावाला
जिओ नेटवर्कचा अजब कारभार
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेगाव बू येथे गेल्या अनेक दिवसांपासून जियो (jio) कंपनीचे सिमकार्ड धारक यांना विस्कळीत नेटवर्क मिळत नसून गावात असलेले टॉवर फक्त नावालाच आणि रेंज नाही गावाला अशी परिस्तिथी निर्माण झाली असून मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावात जिओ चे टॉवर असून सुद्धा मोबाईल किव्हा सिमकार्ड वर कॉल आला तर अचानक कॉल कटतो. कॉल न लागणे, आवाज न ऐकू येणे अश्या नेटवर्क मुळे गावातील मोबाईल वापरणारे नागरिक त्रस्त झाले आहे. अलीकडे सर्वच व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होतात शेतकऱ्यांना बँकेचे व्यवहार करताना मोबाईलचा वापर करावा लागतो. शेती विषयक खत आधारद्वारे मिळते, शासन सुविधांचा लाभ, बँकेचे बहुतांश व्यवहार, ओटीपी, गॅस अनुदान,बव्यापारी वर्ग, ऑनलाईन काम करणारे, इंटरनेट बँकिंग वापरणारे, ऑनलाईन क्लासेस करणारे शाळकरी विद्यार्थी संतापले आहेत.
शेगाव मधील जिओ टावरला असलेले जनरेटर हे कित्येक दिवसापासून नादुरुस्त होत असल्याने ज्या ज्या वेळेला लाईट जाते त्यावेळेला जिओचे नेटवर्क पूर्णपणे बंद होत असून नेहमीच जिओची 5g सुविधा असताना 4g पेक्षाही खतम सुविधा मिळत असल्याने जिओचे ग्राहक संतापलेले आहे विशेष म्हणजे लाईट गेल्यावर कधीही जनरेटर सुरू केले जात नसून त्या टावर पाशी सेक्युरिटी गार्ड सुद्धा नसतो महिन्यातून एखादी वेळ तिथे कुठलातरी एक कर्मचारी येतो थोडा वेळ पहाणी करून निघून जातो व त्याला नाव विचारले असता तो नाव सुद्धा सांगत नाही व मी इथले डिझेल विकतो तुझ्या आणि जे करून घेणे होते ते कर अशाप्रकारे धमकी देतो त्यामुळे संबंधित जिओ नेटवर्क कंपनीने याकडे लक्ष देऊन ग्राहकांना योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्राहक करत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!