नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. विलास गजपुरे यांचे निधन
नागभीड:
नागभीड-ब्रम्हपुरी परिसरातील नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे तसेच विविध सामाजिक संस्थांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले डॉ. विलास होमराजजी गजपुरे यांचे अल्पशा आजाराने सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
डॉ. विलास गजपुरे हे ब्रम्हपुरी अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक, सोनार समाजाचे माजी अध्यक्ष तसेच होमिओपॅथी अकॅडेमी, ब्रम्हपुरीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक व सार्वजनिक जीवनात त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने आणि जबाबदारीने पार पाडल्या.
नागभीड-ब्रम्हपुरी परिसरातील सामाजिक, वैद्यकीय व सार्वजनिक क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. मनमिळावू स्वभाव आणि सामाजिक बांधिलकीमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, वैद्यकीय तसेच सार्वजनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ते प्रमोद गजपुरे यांचे छोटे बंधू, तर कैलास, सतीश, संजय व शेखर गजपुरे यांचे मोठे भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता कळताच विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, बँकेचे संचालक, सोनार समाजाचे पदाधिकारी, मित्रपरिवार व नागरिकांनी गजपुरे परिवाराच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!