सावलीत काँग्रेसचा विविध मागण्यासाठी तहसीलवर मोर्चा धडकणार - आमदार विजय वडेट्टीवार करणार नेतृत्व

 


सावलीः शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिक तसेच विविध सामाजिक घटकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सावली तालुका काँग्रेसच्या वतीने गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता 'जनआक्रोश महामोर्चा' आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाचे नेतृत्व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार करणार आहेत. 

         विविध मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात आला असून, शासनाने जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या माध्यमातून करण्यात येणार आहे. सन २०२५-२६ या वर्षातील शेतकऱ्यांना धानाचा बोनस देण्यात यावा, तसेच २०१७ पूर्वी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीच्या यादीत समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागण्या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. याशिवाय स्मार्ट मिटर लावणे बंद करावे व लावलेले स्मार्ट मिटर काढून घ्यावे, डिसेंबर 2026 च्या उन्हाळी धानाकरीता गोसेखुर्दचे पाणी बारमाही सोडण्यात यावे, OBC/ SC / ST यांना नौकरीत मिळणाऱ्या आरक्षणा व्यतिरिक्त खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात यावे, सन-2026-27 मध्ये सुरू असलेल्या देशाच्या जनगनने मध्ये OBC प्रवर्गा करिता OBC चा स्वातंत्र कॉलम करण्यात यावा. OBC विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुर्वि प्रमाणे मिळण्यात यांवी, श्रावणबाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मागील 6 महिण्यापासून थकित असलेले मानधन ताक्ताळ देण्यात यावे. तसेच बंद असलेले Online Portal पुन्हा सूरु करावे, रासायनिक खते, किटकनाशके, घरघुती गैस सिलेंडरचे वाढलेले दर महागाई कमी करण्यात यावी, समाज कल्याण विभागामार्फत मिळणारा निधी इतरत्र न वळविता त्याच SC / ST या घटकांसाठी खर्च करण्यात यावा, कृषी पंपाकरीता सोलरची सक्ती बंद करून पूर्वी प्रमाणे विद्युत कनेक्शन देण्यात यावे, मंदिरातील दान चोरी करणाऱ्यां व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, वाघांचा बंदोबस्त करण्यात यावा, हिसंक प्राण्याच्या हैदोसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरीत पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, घरकूलांचे रखडलेले अनुदान त्वरीत देण्यात यावे, घरकूल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेतीचे मोफत वाटप करण्यात यावे, आठ महिन्यापासून रखडलेली मनरेगा VB-G-RAM-Gi- योजनेची मंजूरी तात्काळ देण्यात यावी, लाडकी बहीन योजनेत बंद केलेले अनुदान पात्र लाभार्थ्यांना सुरु करण्यात यावे. तसेच नविन लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करावे, शेत पांदन रस्ते सुरु करण्यात यावे, जलजिवन मिशन योजनेची निधी देऊन पाणी समस्या दूर करावी, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला विद्युत बिल व देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, ग्रामपंचायत प्रशासकांना आर्थिक देवान-घेवानीचे अधिकार देण्यात यावे. 

या जनसामान्यांच्या मागण्यांसाठी भुजाडे पेट्रोल पम्प ते तहसील कार्यालयावर आयोजित या जनआक्रोश महामोर्चात तालुक्यातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन आपला आक्रोश शासनापर्यंत पोहोचवावा असे आवाहन सावली तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!