लांडग्यांचा शेळ्या मेंढयांवर हल्ला - लांडग्यांचा बंदोबस्त करण्याची मेंढपाळांची मागणी

 

सावली - सावली वनपरीक्षेत्रातील शेतशिवारात लांडग्यांचा कळप सक्रिय झाला असून दररोज शेळ्या मेंढयांवर हल्ला करुन ठार करीत असल्याने मेंढपाळ फार चिंतेत आहेत. या लांडग्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा ही मागणी मेंढपाळ करीत आहेत.

         तालुक्यातील खेडी, चांदली बुज. येथे मोठ्या प्रमाणात मेंढपाळ असून शेळ्या मेंढ्या पाळणे हा पारंपारीक व्यवसाय आहे. जंगल परिसरात वाघ, बिबट यांची दहशत असल्याने शेतशिवारात पडीक जागेवर मेंढ्या चराईसाठी नेत असतात. सावली, खेडी, चांदली, आकापूर, कवठी या भागात दहाच्या संख्येत असणाऱ्या लांडग्यांचा कळप शेळ्या मेंढयांवर हल्ला करुन ठार मारत असल्याने मेंढपाळ व्यवसाय संकटात सापडत आहे. यामुळे मेंढपाळ दहशतीत असून वनविभागाने लांडग्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!