रिंगदेव तलावाच्या नहराची दुरुस्ती करण्याची मागणी @ दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

 

सावली - चारगाव परिसरातील रिंगदेव तलावाचे नहर नादुरुस्त असल्याने शेती सिंचनासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे सदर कामाची दुरुस्ती करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. काम वेळेत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार व काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीकांत बहिरवार यांनी दिला आहे.

          रिंगदेव तलावातून चारगाव, भारपायली येथील शेतीला पाणीपुरवठा होत असतो. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे कोरडा दुष्काळची परिस्थिती आहे. अजूनही रोवणीची कामे थांबली आहेत. तलावात पाणी आहे मात्र नहर नादुरुस्त असल्यामुळे पाणी शेतात न पोहचता वाया जात आहे. याबाबत शेतकरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नहर दुरुस्तीची मागणी करीत आहेत मात्र अधिकारी पाणी वाटप संस्थेकडे बोट दाखवत याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नहराची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रनेची असतांना दुर्लक्ष करीत असल्याने काम न झाल्यास शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीकांत बहिरवार यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!