नांदेड येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ
तळोधी बा:
नांदेड येथील रहिवासी अबेदा अब्बास शेख (वय ४३, व्यवसाय–मजुरी) या विवाहित महिलेने स्वतःच्या घरातील हॉलमधील खिडकीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेचार वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे नांदेड परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
मृत अबेदा शेख यांच्या पश्चात पती व १२ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तळोधी पोलीस पुढील तपास करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!