सहयोग बँकेचा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम; सावित्रीबाई फुले विद्यालयात वृक्षारोपण

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२०/०८/२०२६
पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, शाखा पवनी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले विद्यालय, पवनी येथे नुकतेच विविध प्रकारच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमाची सुरुवात सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक शाखा पवनीचे शाखा व्यवस्थापक अमोल राजाभोज यांच्या हस्ते विद्यालयातील राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांना कडुलिंबाचे रोपटे भेट देऊन करण्यात आली. त्यानंतर बँक कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विद्यालय परिसरात विविध प्रकारच्या रोपट्यांचे रोपण केले.

यावेळी बोलताना शाखा व्यवस्थापक अमोल राजाभोज यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यात बँकेच्या विविध सामाजिक उपक्रम व निधीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

वृक्षारोपणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यासोबतच ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हा संदेशही देण्यात आला. बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून राबविलेल्या या उपक्रमाचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी बँक कर्मचारी संजय सूर्यवंशी, अरविंद मलेवार, छाया कराडे, शुभम घोरमोडे, सुनिधी भागवत, युवराज शेंडे, प्रिती लोणारे, निता जुमळे तसेच शिक्षक संदीप मुंडले, ललिता डेकाटे, अरुणा कांबळे, अर्चना दडवे, स्मिता मोहरकर, प्रतिक रंगारी यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या सहयोग बँकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!