सक्सेना प्राथमिक शाळेत उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - स्थानिक सक्सेना प्राथमिक शाळा, पवनी येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर तुलाराम जीभकाटे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष विजय रायपूरकर, व्यवस्थापक कमलाकर रायपूरकर, नगरपरिषद सदस्य यादव भोगे, नगरपरिषद सदस्या मनीषा गोमासे, माजी नगरपरिषद सदस्य राकेश बिसने, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा नंदा सलामे, समिती सदस्य अविनाश लांजेवार, श्रीमती शेख तसेच अंगणवाडी कर्मचारी आणि पवनी शहरातील प्रमुख प्रतिष्ठित नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेचे मुख्याध्यापक हर्षल नंदागवळी, सहाय्यक शिक्षिका श्रीमती चौरे, दिनेश साठवणे, तेश्वर्या बिसने तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीताने वातावरण भारावून गेले.
स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका श्रीमती चौरे यांनी केले. उपस्थित मान्यवर, पालक, नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!