अर्जुनी येथे उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा

गोंडवाना समाजाच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - शेगावपासून जवळ असलेल्या अर्जुनी (तु.) येथे जागतिक गोंड सगा मांदी शाखा अर्जुनी (तु.), नगुर-वरोरा मंडोल, चांदा गड यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गोंडवाना समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहांदीपारी कुपार पारो लिंगो राजा रावण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरु. अंकुश मडावी यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम पार पडले. तसेच सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण जागतिक गोंड सगा मांदी शाखा अर्जुनीचे सचिव तिरु. कवडू गोंड येटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिरु. दिगांबर मरापे यांनी केले. त्यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व, गोंडवाना समाजाची संस्कृती, परंपरा, इतिहास आणि सामाजिक एकतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला राजू कुमरे, शंकर सिडाम, बालाजी तोडासे, गोसाई तोडासे, आशिष पेंदाम, संदीप कन्नाके, समीर कुमरे, रायभान कन्नाके, राजकुमार पेंदाम यांच्यासह गोंडवाना समाजातील महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने समाजातील एकता, संस्कृती आणि पारंपरिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. आदिवासी समाजाच्या हक्कांसोबतच शिक्षण, सामाजिक विकास आणि पुढील पिढीला आपल्या समृद्ध परंपरेची ओळख करून देण्यावरही यावेळी भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्जुनी परिसरात गोंडवाना समाजाची सांस्कृतिक एकजूट आणि पारंपरिक वारशाचे दर्शन घडले. उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!