जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू; वन विभागाची तत्पर कारवाई
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दिनांक. ०६ ऑगस्ट ला चिमूर वनपरिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रात नवेगाव परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे ०६:३० वाजता एका जखमी बिबट्याची माहिती वन विभागाला मिळाली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच मानद वन्यजीव रक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाहणीदरम्यान बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत असून त्याला हालचाल करणेही शक्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने सुरक्षितपणे बिबट्याला पकडून शासकीय वाहनातून उपचारासाठी हलविले.
मात्र उपचार सुरू असतानाच सकाळी वेळ सुमारे ०९:०० वाजताच्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नियमानुसार शवविच्छेदन करून रासायनिक विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले व वन विभागाच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार मृत बिबट्याचे वय अंदाजे १० ते ११ वर्षे होते. वृद्धत्वामुळे त्याची शिकार करण्याची क्षमता कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईत ब्रह्मपुरी चे उपवनसंरक्षक एस.आर. कुमारस्वामी सहायक उपवनसंरक्षक अरविंद जे मानद वन्य जीव रक्षक अमोद गौरकर सहाय्यक आयुक्त ( पशुधन) डॉ. राहुल शेंदरे डॉ ओवाड डॉ माधवी गोंगले चिमूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वन विभागाचे अजय नेरलवार, संजय पाटील, सुमित जाधव, रुपेश केदार,अमोल नेवारे,विशाल सोनुने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!