२० वर्षीय विद्यार्थी रहस्यमयरीत्या बेपत्ता; पोलिस तपासावरच प्रश्नचिन्ह

राजीव गांधी हॉस्टेलमधून विद्यार्थी बेपत्ता; तक्रारीनंतरही महिनाभर तपास संथ?
२८ जूनला तक्रार दाखल; रूम पार्टनरचीही चौकशी नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप


चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर शहरातील राजीव गांधी हॉस्टेलमध्ये राहणारा अंश प्रकाश कुंटावार (वय २०), रा. बोर चादली, ता. मुल हा २६ जून २०२६ पासून बेपत्ता आहे. या प्रकरणी त्याचे वडील प्रकाश कुंटावार यांनी २८ जून २०२६ रोजी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार दाखल होऊनही महिनाभर उलटला तरी तपासात अपेक्षित गती नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अंश हा राजीव गांधी हॉस्टेलमध्ये राहत होता. २६ जून रोजी तो हॉस्टेलमधून बाहेर गेल्यानंतर परत आला नाही. त्याचा मोबाईलही बंद लागत असून नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
दरम्यान, अंशसोबत राहणारा घुगुस येथील रूम पार्टनर सध्या उपलब्ध असूनही त्याची सखोल चौकशी करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तपासातील दिरंगाईमुळे अंशच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
अंश बेपत्ता होऊन अनेक दिवस उलटूनही तपासाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याने या प्रकरणाचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः आढावा घेऊन तपास जलदगतीने करावा, तसेच सर्व संबंधितांची चौकशी करून अंशचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!