श्रीगुरुदेव आदिवासी सेवा छात्रालयाच्या अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे यांची सर्वानुमते निवड
श्रीगुरुदेव आदिवासी सेवा छात्रालयाच्या अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे यांची सर्वानुमते निवड
नागभीड | प्रतिनिधी
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते शुभारंभ झालेल्या नवेगाव (पांडव) येथील श्रीगुरुदेव आदिवासी सेवा छात्रालयाच्या अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे यांची संचालक मंडळाने सर्वानुमते निवड केली आहे.
संस्थेचे माजी अध्यक्ष, श्रीगुरुदेव भक्त आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या विशेष बैठकीत प्रा. महेश पानसे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
श्रीगुरुदेवांच्या कृपेने गेल्या ५० वर्षांपासून नवेगाव (पांडव) येथील आदिवासी सेवा छात्रालय गोरगरीब व गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देत आहे. अलीकडेच नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेने छात्रालयासाठी सुसज्ज व प्रशस्त इमारत उपलब्ध करून दिली आहे.
सध्या समाजकल्याण विभागांतर्गत २४ आणि इतर ३१, असे एकूण ५५ विद्यार्थ्यांना छात्रालयात शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यावेळी झालेल्या विशेष सभेला संस्थेचे सर्व संचालक, नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सभेचे नियोजन छात्रालयाचे अधीक्षक ज्ञानेश्वर बोरकुटे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!