राकेश ईखार सीएससी दिनानिमित्त राज्यस्तरीय सन्मानीत
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - CSC दिनाच्या औपचारिकत्य साधून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक सीएससी यांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा MCCIA ट्रेनिंग सेंटर पुणे येथे 2026 आयोजित करण्यात आला होता त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून csc संचालक राकेश विलास ईखार रा. शेगाव बु.तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन पुणे येथे मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र,शिल्ड देऊन सन्मान करण्यात आले आहे,
परिसरातील वैयक्तिक कार्याची नव्हे तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सीएससी परिवारासाठी अभिमानाची गौरवाची बाब आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य प्रमुख वैभव देशपांडे सर आणि सीएससी ची संपूर्ण टीम सोबतच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक सीएससी आणि महाराष्ट्रातील सीएससी वेली यांचा प्रमुख्याने सहभाग उपस्थिती होती. 2019 पासून सीएससी सेंटर या भारत सरकारच्या उपक्रमाचा ग्रामीण भागात सतत लाभ मिळवून देण्याचे कार्य शेगाव बु. सेंटर मार्फत अविरत चालू असून त्यांच्या या कार्याची दखल घेवून सीएससी महाराष्ट्र यांच्यामार्फत राकेश विलास ईखार यांचा उत्कृष्ट VLE चंद्रपूर जिल्हा म्हणून राज्यस्तरावर सन्मान करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!