ब्रह्मपुरीत रात्रीच्या वेळी दुर्मिळ खवल्या मांजराचा रेस्क्यू; वन्यजीव प्रेमींचे कौतुक
ब्रह्मपुरी:
यश कायरकर
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्वाची घटना ब्रह्मपुरीत घडली. कपिलवस्तु नगर परिसरात रात्रीच्या वेळी एका भारतीय खवल्या मांजर असल्याची माहिती वन्यजीव प्रेमी आणि सर्पमित्र पंकज भाऊ माकोडे यांना देण्यात आली या माहितीच्या आधारे त्यांनी
भारतीय खवल्या मांजराला सुरक्षितपणे रेस्क्यू करून तर ते वनविभागाच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे ब्रह्मपुरी वन विभागात एखाद्या अधिवासाच्या ठिकाणी जिवंत खवल्या मांजराला रेस्क्यू करण्याची ही प्रथमच नोंद असल्याची सांगण्यात येत आहे.
*घटना कशी घडली?*
मंगळवार, 21 जुलै 2026 रोजी रात्री 8:52 वाजता कपिलवस्तु नगर, ब्रह्मपुरी येथील नामदेवजी उरकुडे,पेटवाड ब्रह्मपुरी यांच्या घरी झाडांखाली खवल्या मांजर दिसून आला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ वन्यजीव प्रेमी पंकज माकोडे(नेचर इन्व्हरमेंट अँड वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन NGO) यांना सूचना देऊन बोलविण्यात आले. त्यानंतर त्यांनी ते खवल्या मांजराला नऊ वाजून वीस मिनिटांनी सुरक्षित दक्षता घेत त्याला कुठलाही त्रास न देता सुरक्षितपणे पिंजऱ्यात रेस्क्यू केले आणि तशी सूचना वन विभागाला दिली. सूचनेच्या आधारे उत्तर ब्रह्मपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी RFO अरुण कन्नमवार, बायोलॉजिस्ट राकेश आहुजा, बीट गार्ड पंकज चुन्हे, यांना बोलून ते खवले मांजर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळेस खवले मांजर पकडणारे वन्यजीवप्रेमी सर्पमित्र पंकज माकोडे, सर्पमित्र अश्विन उपासे उपस्थित होते .
*खवल्या मांजर म्हणजे काय?*
खवल्या मांजर हा मुंग्या आणि वाळवी खाणारा निशाचर प्राणी आहे. जंगलातील कीटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात याचा मोठा वाटा असतो. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार हा Schedule-I मधील प्राणी असून याची शिकार करणे, पकडणे किंवा विक्री करणे हा गुन्हा आहे.
*पुढील कार्यवाही*
रेस्क्यू केल्यानंतर प्राण्याला तात्काळ वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
स्थानिकांनी वेळीच माहिती देऊन आणि प्राण्याला इजा न पोहोचवता केलेल्या या मदतीमुळे ब्रह्मपुरीतील वन्यजीवप्रेमींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*महत्वाचे*: जर तुम्हाला कुठेही जखमी किंवा बेवारस वन्यप्राणी दिसल्यास त्याला हात लावू नका. त्वरित वनविभागाच्या 1926 हेल्पलाइनवर संपर्क साधा.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!