मातोश्री वृद्धाश्रमात व्यसनमुक्तीचा संदेश; वृद्धांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
मातोश्री वृद्धाश्रमात व्यसनमुक्तीचा संदेश; वृद्धांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
चंद्रपूर : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने व्यसनमुक्ती प्रचार-प्रसार व जनजागृती अभियानांतर्गत चंद्रपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमास भेट देण्यात आली.
यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला. चर्चेदरम्यान अनेक वृद्धांनी व्यसनाधीनतेमुळे कुटुंबातील ताणतणाव वाढल्याने काही जोडप्यांना घर सोडून वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागल्याची व्यथा व्यक्त केली.
यावेळी व्यसनाचे दुष्परिणाम, कुटुंबावर होणारे परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
मातोश्री वृद्धाश्रमात सध्या सुमारे ६० ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास असून, येथील व्यवस्था उत्कृष्ट असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
हा कार्यक्रम नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक इला मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी वृद्धाश्रम व्यवस्थापक रणदिवे जी, व्यसनमुक्ती टीम सदस्य शर्वरी फुलकर यांची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!