पिक विमा प्रतिनिधी यांचे शेतकऱ्यांना 31जुलै च्या आधी पीकविमा नोंदनी करण्याचे आव्हाहन
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आवाहन प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2026 - 27 साठी पिक विमा नोंदणी सुरू झाली असुन शेगाव सहीत वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी 31 जुलैच्या आत नोंदणी करण्याचे आवाहन पिक विमा प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येत आहे जिल्ह्यात इफको टोकियो जनरल इन्शुरन्स मार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे एक्झिस्टा ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे,तसेच डिजिटल पीक सर्वेक्षणानुसार पिकांची नोंद बंधनकारक आहे,प्रत्यक्ष पेरणी केलेले पीक सर्वेक्षणातील नोंद यामध्ये तपावत आढळल्यास रद्द होऊ शकतो बिगर कर्जदार शेतकरी बँक सीएससी केंद्र किंवा पोर्टलवरून नोंदणी करू शकतात तर शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर पडायचे असल्यास त्यांनी मुदतीचा आत परिसरातील बँकेला कळवणे आवश्यक आहे तसेच नैसर्गिक आपत्ती पासून होणाऱ्या नुकसानी पासून रक्षणासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन तालुका पिक विमा प्रतिनिधी यांनी करीत आहेत.शेगाव, सहीत वरोरा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाना आवाहन करतो की आजच सातबारा आधार कार्ड, बँक पासबुक, पिक पेरा व सहमती पत्र धरून आजच आपल्या जवळच्या सीएसटी केंद्र किंवा बँक मध्ये जाऊन आजच पिक विमा काढून घ्या व होणाऱ्या नुकसानीपासून सतर्क रहा.. पिक विमा प्रतिनिधी


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!