दुर्लभ फोर्स्टेन कॅट स्नेक (forsten's cat snake). च्या जोडीला स्वाब सर्पमित्रांनी दिले जीवदान


जिल्ह्यात दोन ते तिनच नोंदी, ब्रम्हपुरी वन विभागातील तळोधी वन परिक्षेत्रात तिसऱ्यांदा नोंद.
तळोधी (बा.);
        ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी च्या तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील धामणगाव (माल) येतील आविष्कार दुबे यांना रात्री नऊ वाजता अंगणातील मंडपावर एक लांब लचक काळे पांढरे चौकर असलेला तपकिरी काळसर रंगाचा एक साप असल्याची माहिती तात्काळ स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांना दिली. संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवेश सयाम व टीम घेऊन रात्री दहा साडेदहाच्या सुमारास धामणगाव ला पोहोचले तर एकअंदाजे पांच ते सहा फूट लांबीच्या फोर्स्टेन कॅट स्नेक (forsten's cat snake)  एक साप दिसला या निमविषारी सापाला रेस्क्यु  करतानाच बाजूला अंगणातील झाडावर त्यापेक्षाही मोठा सात फूट लांबीचा आणखी एक साप आढळून आला. सर्प मित्रांनी झाडावर चढून त्याला सुरक्षित रेस्क्यू केले.
    लोकांना या सापाबद्दल संस्थेद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली ." दुर्मिळ होत चाललेले फोर्स्टेन कॅट स्नेक हे  'निम विषारी' असून याच्या तपकिरी रंगाचे शरिरावर माने पासून शेपटी पर्यंत फिक्कट पांढऱ्या रंगाची आडवे पट्टे असतात, घोनस सापाच्या डोक्याप्रमाने त्रिकोणी आकाराच्या  डोक्यावर डोळे हे मांजर च्या डोळ्याप्रमाने मोठे आणि ऊठुन दिसतात.  हा साप शरीराच्या मानाने लांब असतो अत्यंत शांत स्वभावाचा निशाचर असलेला हा साप भारतात बहुतेक जंगलात आढळतो व झाडाच्या खोलीत अंडे देऊन मादा साप ही त्या अंड्याच्या आसपास राहतो व सरडे , पाली , पक्षांचे अंडे पक्षांचे पिल्ले, उंदीर खातो, मात्र या सापाबद्दलची जास्त ओळख नसल्यामुळे किंवा याला मराठीत असे काही विशेष नाव नाही आहे. त्यामुळे जर लोकांना दिसला तर घाबरून या सापाला परड किंवा घोणस समजून मारूनही टाकतात. हा साप नीम विषारी आहे मात्र हा साप चावल्याने माणूस दगावत नाही त्यामुळे यांना मारू नका व असे साप दिसल्यास आम्हाला माहिती द्या. यांची संख्या खूप कमी असल्यामुळे हे दुर्मिळ होत चाललेले आहेत. या प्रजातीला वाचवण्यात आणि निसर्गात यांना टिकवण्यास मदत करा." असे यश कायरकर यांनी परिसरातील लोकांना आवाहन केले.
माहितीच्या आधारावर चंद्रपूर जिल्ह्यातील या सापा बद्दल चारच नोंद असल्याचे निदर्शनास आले. तर ब्रम्हपुरी वन विभागामध्ये तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात त्यापैकी दोन नोंदी असून आत्ताही जोडी पकडल्यानंतर जिल्ह्यात एकूण सहा नोंदी व तळोदी परिसरात एकुण चार फोर्स्टेन कॅट स्नेक सापाचे नोंद करण्यात आली आहे. 
     या सापांना सुरक्षित रेस्क्यू संस्थेच्या यश कायरकर, जिवेश सयाम या सर्पमित्रांनी केले व त्यांची तळोदी बाळापुर वनविभाग मध्ये नोंद करून त्याच्या सुरक्षित अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. यावेळेस स्वाब नेचर केअर संस्था शैक्षणिक विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, सर्पमित्र जिवन गुरनूले ,गणेश गुरनूले,आदित्य नान्हे, रोहित कापेवार,श्रेयश कायरकर,वनरक्षक पंडित मेकेवाड, वन रक्षक वडजे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!