वाढत्या गुन्हेगारीची समस्या: गणेश मंडळाचे आवाहन
मूल शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सार्वजनिक मंडळाचे आवाहन
मूल : शहरातील काही भागात मागील काही दिवसांपासून भांडण, मारामारी, खुनी हल्ले यांसारख्या अनुचित घटनांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधील सार्वजनिक तरुण गणेश मंडळाने नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे.
या आवाहनात म्हटले आहे की, अशा घातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. परिसरातील रहिवाशांनी सतर्क राहून कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात नागरिकांनी एकत्र येऊन आपली भूमिका मांडण्यासाठी शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गणपती मंदिर, आठवडी बाजार, प्रभाग क्र. १०, मूल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!