चिचाळा शास्त्री येथील युवकाची भारत संरक्षण मंत्रालय (BRO) येथे निवड
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - चिमूर तालुक्यातील चिचाळा शास्त्री या छोट्याशा गावातील आणि गरीब कुटुंबातील युवकाची भारत संरक्षण मंत्रालय (BRO) येथे बॉर्डर रोड ऑरगॅनिझेशन (GREF) च्या अंडर मध्ये ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट या पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या नियुक्तीने गावात तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
चिचाळा शास्त्री येथील तेजस रवींद्र आटे हा घरच्या गरीब परिस्थितीवर मात करून जिद्द आणि मेहनतीच्या विश्वासावर त्याने हे पद
प्राप्त केले आहे. मनामध्ये असलेले देश सेवेचे मोठे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने अथक मेहनत घेतल्याने त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले. गावाच्या इतिहासात बऱ्याच युवकांच्या इंजिनीयर, वकील, संवर्ग विकास अधिकारी असे विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती झाल्या आहेत. परंतु भारतीय सैन्यामध्ये निवड होणारा तेजस हा गावातील पहिला युवक ठरला आहे.
तेजसची वडील रवींद्र आटे यांच्याकडे फक्त तीन एकर शेतजमीन असून आई वडील या शेतीमध्ये काबाडकष्ट करून व इतरांची मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह बिकट परिस्थितीतून करीत असताना तेजसने जिद्द व परिश्रमाच्या जोरावर हे पद मिळवल्याने चिचाळा शास्त्री गावात तसेच परिसरात चर्चेचा विषय ठरला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!