भारतीय जनता पार्टी, मूल शहर यांच्या वतीने घागर मोर्चाचे आयोजन
मूल शहरातील वारंवार होणारा अनियमित पाणीपुरवठा, नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई व नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, मूल शहर यांच्या वतीने घागर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
हा मोर्चा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता रामलीला भवन, मूल येथून सुरू होऊन नगर परिषद, मूल येथे धडकणार आहे.
मूल शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, पाणी समस्येचे तात्काळ निराकरण व्हावे तसेच जनतेच्या मूलभूत हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी, मूल शहर यांच्या वतीने सर्व नागरिक, महिला, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घागर मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!