भावना चौखुंडे यांच्या नेतृत्वात नागरिक एकवटले; चोरट्यांना अटक करण्याची मागणी
भावना अरुण चौखुंडे यांच्या नेतृत्वात नागरिकांचे पोलिस ठाण्यावर निवेदन
मूल : शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत पोलिस प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील रहिवासी श्री. लालाजी बावणे यांच्या घरी दिनांक ८ जून २०२६ रोजी घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी घरातील दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची माहिती नागरिकांनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात सौ. भावना अरुण चौखुंडे यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या शिष्टमंडळाने मूल पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले. निवेदनात वॉर्ड परिसरात नियमित पोलिस गस्त वाढविणे, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे, परिसरातील सीसीटीव्ही व्यवस्था प्रभावी करणे तसेच घरफोडी प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना सौ. भावना चौखुंडे, सौ. वर्षा नागापुरे, सौ. भूमिका चौखुंडे, सौ. वैशाली घायर, सौ. सुषमा मोहुर्ले, सौ. सविता कावळे, सौ. मीना येवतकर, सौ. वंदना मडावी, सौ. स्मिता साखरकर, कु. चैताली चौखुंडे, कु. श्रद्धा कावळे, सौ. दर्शना गुडल्लावार, सौ. शीतल मेश्राम, सौ. भैरवी चौखुंडे, सौ. शीतल बोरकुटे तसेच सौ. ज्योती बावणे उपस्थित होत्या.
चोरीच्या घटनेचा सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!