खेडी मायनरची दुरुस्ती कामाला सुरवात - शेतकऱ्यांच्या मागणीला यश
सावली - खेडी येथील असोलामेंढा प्रकल्पातर्गत लघु वितरिका नादुरुस्त असल्याने शेती सिंचनासाठी अडचणी येत असल्याने पावसाळ्यापूर्वी काम करा अन्यथा आंदोलनाची भूमिका खेडी येथील शेतकऱ्यांनी माजी सभापती विजय कोरेवार यांच्या नेतृत्वात घेतली होती. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता असोलामेंढा प्रकल्प विभागाने काम सुरु केल्याने शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले आहे.
खेडी लघु वितरिकाद्वारे होणारा पाणीपुरवठा सिंचनासाठी कमी पडत असल्याने भूमिगत वितरिकेचे काम मागील ५-६ वर्षांपासून सुरु आहे मात्र अजूनही काम पूर्ण झालेले परंतु ज्या लघु वितरिकेद्वारे सिंचनासाठी पाणी सुरळीत मिळत होते ती वितरिकाच भूमिगत पाईपलाईनच्या कामामुळे प्रभावित झाली. खेडी वितरिकेतून ८०० हेक्टर शेतीला सिंचनासाठी खरीप हंगामात नेहमी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र असोलामेंढा प्रकल्पातील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पावसाळ्यापूर्वी या वितरकाचे काम न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा खेडी येथील शेतकऱ्यांनी माजी सभापती विजय कोरेवार यांच्या नेतृत्वात असोलामेंढा प्रकल्प कार्यालयात १ जून रोजी दिला होता. २ जून रोजी अधिकाऱ्यांनी पाहणी करीत काम लवकर करणार असल्याचे आश्वासन दिले. आज ९ जून रोजी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली असल्याने शेतकरी समाधानी आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!