न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न.

                           
 न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न. 

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत  सनातन संस्था या न्यासातर्फे मंगळवार दिनांक ०९ जून २०२६ रोजी श्री.मनिष कोंतमवार यांचे घरी,वार्ड क्र.१४, मूल येथे बालसंस्कार शिबीर घेण्यात आले. 
    सनातन संस्था या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. 
       लहानपणीच मूलांवर चांगले संस्कार व्हावे, आपल्या संस्कृतीचा परिचय व्हावा तसेच धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम वाढावे या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला .
        न्यासाच्या वतीने सौ. निता आयलनवार यांनी  मार्गदर्शन केले .या उपक्रमासाठी सौ.भारती कोंतमवार आणि सौ.विणा मार्तीवार यांनी परिश्रम घेतले .
      या उपक्रमाचा लाभ १८ मुलांनी घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!