सोमनाथ रोडवरील रेतीची जड वाहतूक तात्काळ बंद करण्याची भाजपची मागणी
मूल : मूल शहरातील सोमनाथ रोड मार्गावर सुरू असलेल्या रेतीच्या जड वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण आणून ती बंद करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदार, यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोमनाथ रोडवरून दिवसरात्र रेतीने भरलेली वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने शहरातील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमनाथ रोडवरील रेतीची जड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत
मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर
तसेच पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनाही देण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!