पंचायत समिती चिमूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती चिमूर येथे आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी मा. गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, तणाव कमी होतो तसेच कार्यक्षमता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी, विभागप्रमुख, अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती चिमूर यांच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी यावेळी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करून आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश समाजात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!