गुरुकुल CPS क्लासेसचे शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा जिल्ह्यात वर्चस्व!

इ.५ वी व ८ वीच्या निकालात विद्यार्थ्यांनी मारली बाजी

तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२३/०५/२०२६ महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा मंडळामार्फत फेब्रु.२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इ.५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून,यात पवनी येथील 'गुरुकुल CPS क्लासेस'च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत क्लासेसने जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखले आहे.
श्रेयशी चव्हाण आणि स्वराज कुंभारगावे तालुक्यात प्रथम:
घोषित झालेल्या निकालामध्ये गुरुकुल CPS क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून तालुक्यात अव्वल स्थान पटकावले. यामध्ये श्रेयशी चव्हाण इ.८ वी,हिने पवनी तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.तर‌ स्वराज कुंभारगावे इ.५ वी,याने उत्कृष्ट गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला.
यशाची दैदिप्यमान परंपरा कायम:
विशेष बाब म्हणजे,मागील वर्षीदेखील गुरुकुल CPS क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत भंडारा जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश मिळवले होते. यंदाही इ.५ वी चे १५ तर इ.८ वी चे ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. 
विविध स्पर्धा परीक्षांमध्येही 'गुरुकुल'चाच डंका!
केवळ शिष्यवृत्तीच नव्हे,तर चालू शैक्षणिक वर्षात गुरुकुल CPS क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी इतरही अनेक प्रतिष्ठेच्या परीक्षांमध्ये जिल्ह्यावर आपली मोहर उमटवली आहे. NMMS परीक्षेत जिल्ह्यात अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्र : राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्र. बालवैज्ञानिक परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्र.
मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम क्र.  संचालकांचे अचूक मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द!"विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, पालकांचे प्रोत्साहन आणि गुरुकुल CPS क्लासेसचे संचालक रवी भिसेकर यांचे अचूक नियोजन व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यांमुळेच हे यश शक्य झाले," अशी कृतज्ञ भावना यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.  पवनी परिसरात कौतुकाचा वर्षाव: सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य नियोजनाच्या बळावर दरवर्षी उत्कृष्ट निकाल देऊन गुरुकुल क्लासेसने पवनीच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढवला आहे.या घवघवीत यशाबद्दल संपूर्ण पवनी परिसरातील नागरिकांकडून यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून,भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!