वर्धा नदीतून अवैध रेती उत्खननावर एलसीबीचा छापा; ५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा नदीतून अवैध रेती उत्खननावर एलसीबीचा छापा; ५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त


चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात मोठी कारवाई करत बल्लारपूर परिसरात वर्धा नदी पात्रातून सुरू असलेला रेती चोरीचा प्रकार उघडकीस आणला. दि. १४ मे २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा बल्लारपूर परिसरात वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार PSI सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मपुरी उपविभाग पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि रेतीचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अप.क्र. 576/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2), 49 तसेच जमीन महसूल कायदा कलम 48(7), 48(8) व मोटार वाहन कायदा कलम 177 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत आरोपी विनोद विठ्ठल आत्राम (रा. बल्लारपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुनमचंद बहुरिया (रा. बल्लारपूर) हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जप्त मुद्देमाल :
ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्र. MH34BV2632 (किंमत ५ लाख रुपये)
एक ब्रास रेती (किंमत १० हजार रुपये)
एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई PSI सर्वेश बेलसरे व ब्रह्मपुरी उपविभाग पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली. अवैध रेती उत्खननाविरोधातील या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!