तोरगावमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर एलसीबीची धडक कारवाई; ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

तोरगावमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर एलसीबीची धडक कारवाई; ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त


ब्रम्हपुरी : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव येथे अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई करत देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. दि. १३ मे २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा तोरगाव येथे अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार उपविभाग ब्रम्हपुरी पथकाने छापा टाकून दोन आरोपींविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५(ई), ८३ अंतर्गत अप.क्र. 463/26 व 464/26 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

पहिल्या कारवाईत :

शैलेंद्र रामटेके (वय ५४, रा. तोरगाव) याच्याकडून

४ पेट्या (१९२ नग) देशी दारूच्या १८० एमएलच्या बाटल्या किंमत १५,३६० रुपये

१ पेटी (१०० नग) देशी दारूच्या ९० एमएलच्या बाटल्या किंमत ४,००० रुपये
असा एकूण १९,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत :

पितांबर लुटे (वय ३४, रा. तोरगाव) याच्याकडून

३ पेट्या (१४४ नग) देशी दारूच्या १८० एमएलच्या बाटल्या किंमत ११,५२० रुपये

१ पेटी (१०० नग) देशी दारूच्या ९० एमएलच्या बाटल्या किंमत ४,००० रुपये

१ पेटी (४८ नग) विदेशी दारू “No.1” च्या १८० एमएलच्या बाटल्या किंमत १०,०८० रुपये
असा एकूण २५,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही कारवायांमध्ये मिळून १० पेट्या देशी व विदेशी दारूचा सुमारे ४४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई उपविभाग ब्रम्हपुरी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली असून अवैध दारू विक्रेत्यांविरोधातील कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!