रात्रोच्या वेळी वाळूची दाबून चोरी
कपर्ला येथील वाळू भरलेला ट्रॅक्टर केला चिमूर तहसील कार्यालयात जमा
मधूकर दडमल बापलेक करतात मागील चार महिन्यांपासून वाळूची चोरी!
जांभुळघाट येथील पटवारी उमेश भांदेकर यांनी केलाय नागरिकांसमोर वाळू भरलेल्या ट्रॅक्टरचा जप्तीनामा
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जूनी )
चिमूर : - चिमूर तालुक्या अंतर्गत येत असलेल्या मौजा कपर्ला येथील रहिवासी असलेले मधूकर दिवाकर दडमल हे विना राॅयल्टी वाळूची चोरी रात्रोच्या वेळी करीत असताना,मौजा कोटगाव येथील तरुणांनी त्यांचे वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडून ग्रामपंचायत कोटगाव जवळ उभे केले.
सदर घटना दिनांक १८/०५/२०२६,रोज सोमवार च्या रात्रो ११ ते ११.४५ वाजताच्या दरम्यानची आहे.वाळू भरलेल्या ट्रॅक्टर चा क्रमांक MH.34,B.R.3582 असून ट्रॅक्टर चालकाचे नाव नितेश जिवतोडे आहे.
भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या भांदवी कलम ५१ नुसार नागरिकांना त्यांच्या जवळपासच्या आणि त्यांच्या क्षेत्रातील गौण खनिज असलेल्या वाळूचे रक्षण करण्याचा अधिकार आहे.याचबरोबर वाळू चोरीची चोरटी वाहतूक बंद करण्याचे अधिकार सुध्दा नागरिकांना आहेत.
याच अधिकाराचा चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथील तरुणांनी केला असून संबंधित महसूल अधिकारी आणि पोलिस अधिकारी उत्तम कर्तव्य पार पाडतील अशी अपेक्षा मौजा कोटगाव येथील नागरिकांना आहे.
चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रिधर राजमाने व भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोंगाडे यांना घटनेची माहिती दिली होती.
जांभुळघाट तलाठी उमेश भांदेकर हे मौजा कोटगाव येथे रात्रो साडेबारा वाजताच्या दरम्यान आले व वाळू भरलेल्या ट्रॅक्टर चा जप्ती पंचनामा नागरिकांसमोर करुन,तहसील कार्यालय चिमूर येथे वाळू भरलेला ट्रॅक्टर रात्रोलाच जमा केलाय. पण हाच रेती टॅक्टर जर लोक प्रतीनीधीच्या कार्यकर्ताचा किंवा पदाधिकाऱ्या असता तर महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी पंचमामा करण्यासाठी आलेच नसते ही सत्यता नाकारता येत नाही.याच तलाठी क्षेत्रात शासकीय आश्रम शाळा आहे तीथे दोन नविन इमारती चे बांधकाम कंत्राटदार द्वारे केला जात आहे.या बांधकासाठी शेकडो ब्रास अवैध रेती वापर केला जात आहे व शेकडो ब्रास अवैध रेती चा साठा आताही साठवून ठेवला आहे याची माहीती महसुल विभागाला देण्यात आली आहे पण आता पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही.कारण कंत्राटदार व अवैध रेती उत्खनन करणारे लोकप्रतीनीधीच्या एकदम जवळचे असल्याने महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यवाही करण्याची हिम्मतच होत नाही.महसुल विभागाचा कोतवाल हा स्वताच्या चार चाकी वाहानाने फिरताना पाहायला मिळत आहे. हि जी कार्यवाही झाली ती गावकऱ्याच्या सहकार्याने झाली आहे.
मौजा कोटगावच्या सभोवताल असलेल्या नदी पात्राला वाळू चोरांनी अक्षरशः पोखरून काढले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!