शासकीय इमारती बांधकामाकरीता कंत्राटदार करतो अवैध रेतीचा सर्रास वापर
रेती तस्कर खुले-आम करतात अवैध रेती चा पुरवठा
कंत्राटदारावर व रेती तस्करावर कारवाई होणार का..?
महसुल विभाग शांत का?
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट पोस्ट बेसीक शासकीय निवासी आश्रम शाळा येथे नविन दोन इमारतीचे बांधकाम सुरू असून,या इमारतीच्या बांधकामासाठी मोठया प्रमाणावर अवैध रेतीचा वापर कंत्राटदार करीत आहे.
या बांधकामासाठी शेकडो ब्रास अवैध रेतीचा वापर कंत्राटदार करीत आहे.शेकडो ब्रासचा साठा कंत्राटदाराने इमारत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साठवून ठेवलेला आहे.
या ठिकानी खुले-आम रेती तस्कर अवैध रेती चा ट्रॅक्टर द्वारे रात्री व सकाळला पुरवठा करीत आहे. पण महसुल विभागा कडून कोणत्याही प्रकार ची आता पर्यंत कारवाई झालेली नाही. या ठीकान आताही अंदाजे शंभर ब्रास साठा असल्याची खात्री आहे. या रेती साठ्याची चिमूर महसूल विभागाकडून योग्य चौकशी करून कंत्राटदारावर व रेती तस्कारा फौजदारी कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरीकांकडून केली जात आहे. तसेच या परीसरातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचे वर शुध्दा चौकसी करून कार्यवाही करण्यात यावी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!