संत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम
संत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम
सतत 5वर्ष 100%निकाल
राजोली (ओंकार माडेकर)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात संत तुकडोजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर द्वारा संत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय,चिखली तह. मूल जी. चंद्रपूर येथिल विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या महाविद्यालयाचा 100% निकाल लागला असून एकूण 33 विध्यार्थी परीक्षेला बसले होते सर्व विध्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये कु. रागिणी बंडू धंदरे इने 83.50%गुण मिळवून तालुक्यात द्वितीय व महाविद्यालयातून प्रथम आली. तसेच कु. इशा जगदीश चौधरी इने 83.17% तालुक्यात तृतीय व महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु. जानवी ईश्वर जोलमवार 81.50% गुण प्राप्त करुन तिसरा क्रमांक प्राप्त केला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम राखण्यात आली.5विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर 20विध्यार्थी प्रथम श्रेणीत तर 8विध्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रा. श्री.विठ्ठलराव चौथाले, संस्थेचे सचिव सौ . डॉ. प्रा. वंदनाताई विठ्ठलराव चौथाले व पदाधिकारी, तसेच प्राचार्य श्री. दुर्वास ए. कडसकर, प्रा. युवराज रामटेके सर, प्रा. नितेश गेडाम सर लिपीक श्री. कैलास कडसकर तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
कु. रागिणी बंडू धंदरे 83.50
इशा जगदीश चौधरी83.17%
जानवी ईश्वर जोलमवार 81.50%



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!