शेगाव पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेलचा तुटवडा

खाजगी दुकानात अवैधरित्या चढ्या भावाने विक्री

वाहन धारकांची सर्रासपणे लूट

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव हे सर्वात मोठे गाव असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे या गावाला 60 ते 70 खेडे जोडलेली आहेत या ठिकाणी दोन पेट्रोल पंप असुन सध्या या ठिकाणी डिझेल, पेट्रोलचा तुटवडा दोन दिवसापासून निर्माण झालेला असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात लग्न समारंभ, शेती हंगामाची कामे सुरू असून  शेतकरी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी वखरणी ची कामे करताना दिसत आहे. तसेच मागील दोन ते तिन दिवसापासून शेगाव पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प पडलेली आहेत.

तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लग्न समारंभाचे कार्यक्रम ठिक - ठिकाणी सुरू असून पेट्रोलचा तुटवडा असल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहन धारकांना वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यातच या परिसरात अवैधरित्या डिझेल व पेट्रोल साठवणूक करून ठेवलेल्या काही दुकानदारांनी याचाच फायदा घेत चड्या भावाने डिझेल पेट्रोल ची विक्री करीत सर्रासपणे ग्राहकांची लूट सुरू केलेली आहे. याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असून यांचेवर कारवाई करणार तरी कोण? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. आणि मुख्य म्हणजे ही विक्री शेगाव बस स्टॉपच्या ऐन मुख्य रस्त्यावर होत असून प्रशासनाने आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला असल्याने पंपावर नागरिकांचा रोष बघावयास मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!