डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी व वाहनचालक त्रस्त


चिमूर परिसरातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

तालूका - प्रतिनिधि ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील पेट्रोल-डिझेल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी तसेच खाजगी वाहन चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. डिझेल उपलब्ध नसल्यामुळे अनेक पंपांवर ट्रॅक्टर, मालवाहू वाहने तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
सध्या शेतीचा हंगाम असून शेतीची कामे सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर कृषी यंत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता आहे. मात्र पंपांवर डिझेलचा पुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांना पंपावर डिझेल करीता तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी डिझेल संपल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

खाजगी वाहन चालकांनाही या तुटवड्याचा मोठा फटका बसत आहे. वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रांगेत उभे राहावे लागत असून त्यामुळे वेळेचा अपव्यय होत आहे. अनेक वाहन चालकांनी प्रशासनाने तातडीने डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, डिझेलचा पुरवठा लवकरच पूर्ववत होईल, असे संबंधित पंप चालकांकडून सांगण्यात येत असले तरी नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!