दूषित पाण्याने बल्लारपूर येथील नागरिक त्रस्त. शहर विकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा.
प्रतिनिधी वसंत मुन
दुषीत पाण्याने बल्लारपूर येथील जनता त्रस्त.
शहर विकास आघाडीचा जन आंदोलनाचा इशारा.
महाराष्ट्र जिवन प्राधीकरण विभागातर्फे बल्लारपूर येथील नळ ग्राहकांना आरोचे फील्टर शुद्ध पानी पुरवठा करण्याचे योजनेवर करोडो रुपये खर्च केले आहे. परंतु सदर योजना सपशेल अपयशी ठरली असून गेल्या एक आठवड्यापासून नळग्राहकांना फेसाळ,दुर्गधीयुक्त, काळे-पीवळे रसायनं मिश्रित पुरवठा करण्यात आला. दूषित पाण्यामुळे नागरीकांना डायरीया, पीलीया सारखे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. याशिवाय संतोषी माता कार्ड, रविंद्र नगर वार्ड, हनुमाननगर वार्ड, आंबेडकर वार्ड,साईबाबावार्डातील काही भागातील नळग्राहकांना मुळीच पाणी पुरवठा होत नसल्यामुळे शहरातील नागरीक संतप्त झाले आहे.
या गंभीर घटनेची दखल घेवून शहर विकास आघाडीचे अध्यक्ष व न.प.चे पूर्व उपाध्यक्ष श्री भारत थूलकर आणि प्रभाग क्र. ८ च्या नगरसेविका प्रीयंका थूलकर यांचे नेतृत्वात जिवन प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता श्रीमान धनंजय जगधने व उपअभियंता श्री कटके साहेब यांना लेखी निवेदन सादर करून, नागरीकांना दुशीत पाणी पुरवठा ताबडतोब बंद करण्यात यावा, तसेच शहरातील सर्व नळग्राहकांना पुरेशे पाणी पुरवठा करण्याची उपाययोजना महाराष्ट्र जिवन प्राधीकरणतर्फे त्वरीत करावी. अन्यथा कोणतीही पुर्वसूचना न देता नळग्राहकांना पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात येईल. असा इशारानिवेदनातून दिला. शिष्टमंडळात श्री शरद वानखेडे, विशाल रामटेके, नितीन लभाने, दिशांत चिवंडे, प्रशांत घडसे, अशोक पाटील, नरेंद्र हीरे, प्रदीप सातपुते, छोटू रिंगने, बबलू रेड्डी, लवलेश वेलेकर, शेख सादीक, रज्जन जयस्वाल, संघमित्रा भड़के इत्यादींचा समावेश होता.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!