ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टर मुंड्याखाली दबून मृत्यू
चिमूर तालुक्यातील डोमा किटाळी गावाजवळील घटना
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील डोमा किटाळी गावाजवळील शेतामध्ये चिमूर - शंकरपुर महामार्गालगत असलेल्या शेतातील काम करुन घरी परत येत असताना किटाळी गावाजवळ ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची दुखत घटना बुधवारी सायंकाळी ०५:३० वाजताच्या सुमारास घडली. मयूर मन्साराम गोहणे वय २५ वर्षे राहणार डोमा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
काकाची ट्रॅक्टर घेऊन मयूर बुधवारी कचरू चौधरी यांच्या शेतात मातीकाम करण्यासाठी गेला होता. शेतातील काम करून झाल्यानंतर सायंकाळी घराकडे परत जात असताना शेतातील उंच पाळीमुळे ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि अचानक ट्रॅक्टर मुंडा उलटला. त्यामुळे झालेल्या अपघातात ट्रॅक्टर मुंड्या खाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!