चिमूर शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - दिनांक. १४/०५/२०२६ दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर शहरात चिमूर कांपा उमरेड राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत हजारे पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी महाराज महाराज चौक याठिकाणी  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव होते. ते एक पराक्रमी योद्धा सुद्धा होते, ज्यांनी आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात १२० हून अधिक लढाया लढल्या आणि एकही लढाई न हरता हिंदवी स्वराज्य टिकवले. स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे त्यांना जगभरात 'धर्मवीर' म्हटले जाते. तर अशाच प्रकारे चिमूर शहराची सुद्धा क्रांती भूमी म्हणून ओळख असून सर्वच प्रभागाची ओळख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिकारी तथा शहीदांच्या नावाने प्रसिद्ध आहे.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त चिमूर येथे छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित महाराजांचा पूजन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये चिमूर - ७४ विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.व यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. जनतेला महाप्रसादाचे वाटप करून उपस्थित नागरिकांशी संवाद साधत महाराजांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा व हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानास अभिवादन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास माजी चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष सतीशभाऊ वारजुकर, चिमूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष संजयभाऊ नवघडे, पवन बंडे,वैभव लांडगे,पवन डुकरे,गोविंदजी सारडा, बंटी वनकर, अमित जुमडे, सागर निंबोरकर, अभिजित कोरडे, नंदू सातपैसे, सारंग बंडे, अर्चित सातपुते, गिरीधर रणदिवे, रोशन येळने, पवन डुकरे, सुभाष मोहिणकर,तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी, नागरिक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!