पिंपळगाव नदी वरून खुले-आम अवैध रेती तस्करी

महसुल विभागाचा आर्शिवाद रेती तस्कराना

तालूका - प्रतीनीधी ( केवलसिंग जूनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यात खुलेआम अवैध रेती उत्खनन होत आहे. परंतु महसुल विभाग गाढ झोपीत असल्याचे दिसत आहे.ग्राम महसुल अधिकारी तसेच महसूल विभागाच्या आर्शिवादाने चिमुर तालूक्यात सर्रास पणे अवैधरित्या रेतीचे उत्खनन सुरू आहे. तालूक्यातील पिंपळगाव येथील नदी पात्रातून खुले आम अवैधरित्या वाळू उपसा मोठया प्रमाणावर केला जात आहे.या अवैध वाळू उपसा कडे महसुल विभागा कड़ून लक्ष दिले जात नाही.रात्रोला टॅक्टर द्वारे पिंपळगाव नदीतुन अवैध वाळू उपसा केला जात असून रेती उपसा करणारे हे भिसी येथील असल्याची गावाकऱ्यांमध्ये चर्चा आहे.दहा दिवसा अगोदर एका रेती तस्कराला गाव कऱ्यांनी छान झोडपून काढलं असल्याची सुद्धा चर्चा होत आहे.या माफियावर मंडळ अधिकारी व तलाठी यांचा मोठा आर्शिवाद असल्याने या चित्रावरून खुले-आम अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे दिसून येत आहे. महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवर्जून याकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी.अश्या प्रकारची मागणी सध्या नागरीका कडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!