महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम निकालाची टक्केवारी ८८.३९%


महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

 निकालाची टक्केवारी ८८.३९%

​तळोधी (बाळापूर):

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेत नागभीड तालुक्यातील तळोधी (बाळापूर) येथील कल्याण शिक्षण संस्था नागपूर संचालीत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ८८.३९% लागला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
​विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी:
​यावर्षीच्या निकालात मुलींनी विशेष बाजी मारली असून विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची टक्केवारीसह यादी खालीलप्रमाणे आहे:
​कु. खुशी चंद्रभान झोडे: ९०.८०% (विद्यालयात प्रथम)
​फरहान जानीबाबू शेख: ९०.२०% (विद्यालयात द्वितीय)
​कु. ग्रीष्मा राजेंद्र शामकुळे: ८७.६०% (विद्यालयात तृतीय)
​कु. प्रीती नंदू मारभते: ८६.६०%
​कु. प्रिया सचिन पाकमोडे: ८२.००%
​कु. सानिया रामदास नान्हे: ८०.४०%
​कु. समिधा धीरज ढगेश्वर: ७९.२०%
​कु. ग्रीष्मा दिलीप वाढई: ७८.८०%
​कु. खुशबू जयेश लोंढे: ७८.६०%
​कु. छकुली खुशाल जुमडे: ७८.४०%
​कु. सुहानी सदाशिव रोहणकर: ७७.००%
​कु. कीर्ती योगराज ठलाल: ७७.००%
​कु. रूंजन सुरेश हजारे: ७६.४०%
​कु. श्रुती उमेश बोरकर: ७६.४०%
​कु. अंजली डोनू नरवास: ७५.२०%
​कु. मानसी मनोज कामडी: ७४.४०%
​कु. सुहाना तिरुपती देशमुख: ७४.००%
​विनम्र गौतम सहारे: ७३.८०%
​कु. मानसी दिलीप शेंडे: ७२.६०%
​कु. आस्था इंद्रजित राहुड: ७२.६०%
​कु. चंदा रविनाथ मासुरकर: ७२.४०%
​कु. शिवानी मनोहर मुंगमोडे: ७१.८०%
​सम्यक उत्तम गेडाम: ७१.६०%
​कु. रोहिणी प्रमोद सडमाके: ७१.००%
​निकालाचे विश्लेषण
​विद्यालयाचा निकाल अतिशय उत्साहवर्धक असून एकूण १५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य (Distinction) श्रेणी मिळवली आहे. तसेच ४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
​मान्यवरांकडून कौतुक
​विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उन्मेषजी गेडाम साहेब, सरचिटणीस सौ. मालतीताई गेडाम मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जी. जे. बुलबुले सर, उपमुख्याध्यापक श्री. अजय कोराने सर, पर्यवेक्षक श्री. टिंगणे सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे परिसरात सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!