लोकविद्यालय तळोधी(बा) शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम कु.संजना मानापुरे तालुक्यात प्रथम, कु.भैरवी बोरकर तालुक्यात द्वितीय



तळोधी(बा) ०८मे२०२६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये सीसीटीव्हीच्या निगराणीत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत दि रूरल एज्युकेशन सोसायटी, ब्रम्हपुरी सन १९६० द्वारा संचालित लोकविद्यालय तळोधी(बा) विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ६० टक्के लागला आहे.
या निकालामध्ये कु. संजना सुखदेव मानापुरे हिने ९३.६० टक्के गुण मिळवून नागभीड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच कु. भैरवी घनश्याम बोरकर हिने ९३.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. ओमश्री ओमप्रकाश खडसिंगे याने ८९.८० टक्के गुण मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
विद्यालयातील १३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व मार्गदर्शक श्री. व्ही. एस. तोंडरे साहेब, सचिव श्री. आर. एस. राऊत साहेब, श्री. व्ही. एस. बगमारे साहेब, श्री. ए. आर. नागमोती साहेब, श्री. ए. एस. राऊत साहेब, श्री. डी. पी. समर्थ साहेब, मुख्याध्यापक श्री. प्रकाश बुराडे साहेब तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. संजय पालवे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले.
तसेच आर. एम. निनावे, ए. एन. कोहळे, पी. एल. इजकापे, संतोष नन्नावार, सोनल उंबरकर, अजय सगळाम, स्नेहा गोहणे, प्रिती डंभारे, ज्योती मोहुर्ले, स्वाती बागडे, अक्षय सुकारे, शिशिर कोरेकर, सिद्धेश वैरकर, एकनाथ भगत, संजू शेंडे, सुरेश कुमरे, टुमदेव बगमारे तसेच इतर शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!