टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईच्या चार विद्यार्थ्यांची नागभिड तालुक्यातील नऊ गावांत क्षेत्रभेट;
टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईच्या चार विद्यार्थ्यांची नागभिड तालुक्यातील नऊ गावांत क्षेत्रभेट;
तळोधी (बा.) बातमीदार:-
सामुहिक वन हक्क कायदा अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ नियम २००८ सुधारित२०१२ अंतर्गत प्रत्यक्ष अंमलबजावणी, तसेच कलम ३(१)(झ) अंतर्गत वनक्षेत्राचे संवर्धन, मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड, तेंदुपत्ता संकलन आदीं विविध योजनांचा अभ्यास करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईचे चार विद्यार्थ्यांनी नागभिड तालुक्यातील नऊ गावांत (एफईएस) या संस्थेमार्फत क्षेत्रभेट पुर्ण करण्यांत आली.
नागभिड तालुक्यातील किरमटी, खडकी, सावंगी, कोजबी, धामणगाव, सोनुली, येनोली, देवपायली, कोदेपार, या नऊ गावांमधे सामुहिक वन हक्क कायदा अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम अंतर्गत मोठ्या प्रमाणात मनरेगा, वृक्षलागवड, तेंदु संकलन, श्रमदान, आदीं विविध योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईचे अनु देशांतरी, करन कुमार, मीनल गोयल, ऋजुता आगाशे या चार विद्यार्थ्यांना संपुर्ण विषयांची सविस्तर माहिती गणेश भुते यांनी दिली.
तिस दिवसीय या क्षेत्रभेटीमधे प्रत्यक्ष गावांतील विद्यार्थी, ग्रामस्थ, वनहक्क समितीचे सदस्य, महिला यांचे सोबत संवाद साधला. या कायद्या अंतर्गत गावकऱ्यांना हक्क मिळाला असुन स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला असल्याने मजूराचे स्थालांतरण थांबले असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले. कायद्याचे अंमलबजावणी मुळे गावकऱ्यांमध्ये "हे जंगल आपले आहे." ही भावना निर्माण झाली. तसेच ग्रामसभेत जंगल गस्ती, चराई, गैणखनिज गोळा करणे व विक्री, आदी बाबत नियमावली तयार करण्यात आली. तर बँक खाते, आर्थिक व्यवहार, लेखा परिक्षण व ऑडिट बाबत नियम तयार करणे तथा स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून जंगलाचे संरक्षण करणे आदीं बाबतींत संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना गणेश भुंते यांनी दिली. एकूणच सामुहिक वन हक्क कायदा ग्रामिण भागांत शाश्वत विकासाचे एक प्रभावी माध्यम ठरतं असुन, गावकऱ्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही चालन देत असल्याचे या क्षेत्रभेटीत दिसुन आल्याने विद्यार्थी समाधानी झाल्याचे गणेश भुते यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!