अवंतिका तुळशिराम राऊत कर सहाय्यक (Tax Assistant) पदावर निवड



चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील रूद्रापूर येथील शेतकरी कुटुंबातील अवंतिका तुळशिराम राउत यांची कर सहाय्यक (Tax Assistant) पदावर निवड झाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशामुळे गावासह परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा रूद्रापूर येथे झाले माध्यमिक शिक्षण रमाबाई आंबेडकर सावली येथे झाले

अवंतिका राउत यांनी आपल्या मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. साध्या शेतकरी कुटुंबातून येत असताना त्यांनी सर्व अडचणींवर मात करून ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामागे आई वडील कुटुंबीयांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

त्यांच्या निवडीबद्दल गावातील मान्यवर, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्या अशाच प्रकारे प्रगती करत राहाव्यात आणि समाजासाठी प्रेरणादायी ठराव्यात, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!