लक्षवेध- ग्रामीण रुग्णालय पवनीतील गंभीर अनियमितता – जबाबदारांवर कारवाई करा अन्यथा बदली करा
शहर - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - पवनी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भवती महिलांच्या सिझेरियन (सिजर) शस्त्रक्रियेसाठी आवश्यक औषधे व सर्जिकल साहित्य वारंवार “साठा संपला” या कारणावरून बाहेरून खरेदी करण्यास सांगितले जात आहे. आठवड्यातून फक्त एकदाच – बुधवारी – सिजर होत असताना देखील साठा नसल्याचे कारण देणे ही अत्यंत गंभीर व संशयास्पद बाब आहे.जर खरोखरच नेहमी साठा संपत असेल, तर तो वेळेवर उपलब्ध करून देणे ही वैद्यकीय अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे. नियोजन करण्यात वारंवार अपयश येत असेल, तर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःची बदली करून घ्यावी. जनतेच्या आरोग्याशी प्रयोग करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
गरीब व सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक भार टाकून शासनाच्या आरोग्य व्यवस्थेची प्रतिमा मलिन केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून औषध व साहित्य साठ्याचा लेखाजोखा जाहीर करावा,
दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी,रुग्णालयात सर्व आवश्यक साहित्य कायमस्वरूपी उपलब्ध राहील याची हमी द्यावी.
अन्यथा जनतेच्या हक्कासाठी तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.
संजय पुरी वैकुंठे
धनराज उपरीकर, पवनी


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!