मेटेगावच्या युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू
सावली - सावली वरून आपल्या गावी मेटेगाव येथे दुचाकीने जात असतांना दि. २० एप्रिलला सायंकाळच्या दरम्यान चक मानकापूर जवळ दुचाकीवरून तोल गेल्याने प्रफुल अशोक दलांजे (वय ३०) याचा अपघात झाला. लगेच सावली ग्रामीण रुग्णालयात भरती केले मात्र उपचारास प्रतिसाद देत नसल्याने गडचिरोली येथे रेफर केले तिथून नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र गंभीर दुखापत असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेहनती युवक असून मागील महिन्यातच त्याचा विवाह झालेला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!