26 जुन पासुन शाळा सुरू करा - कवडू लोहकरे यांची मागणी

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमुर : -  शालेय शिक्षण विभागाने विदर्भातील शाळा १५ जुन पासुन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे पण उष्णतेचा विचार करता शाळा २६ जुन ला सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू लोहकरे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

 राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचे दिवस ठरले आहे.२  मे पासून  ते १४ जुन पर्यंत उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे.  जून मध्ये विदर्भातील उष्णतेचा विचार करता १५ जुन ते २९ जुन पर्यत सकाळच्या पाळीत शाळा सुरू राहणार आहेत  व ३० जुन पासुन नियमीत शाळा सुरू राहतील.अपवाद म्हणून विदर्भातील शाळा उशिरा सुरू करण्याची पद्धत यंदा बंद करण्यात आली आहे.दरवर्षी जुन मध्ये विदर्भात उष्णतेचा विचार करता उशिरा सुरू करण्याची पद्धत होती.यंदा ही पद्धत रद्द करून राज्यभर एकसमान वेळापत्रक लागु करण्याचा परिपत्रक  २८ मार्चला शिक्षण विभागाने काढले.त्यामुळे शिक्षक व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

अनेक शिक्षक संघटनांनी या निर्णयाचा विरोध केला.विदर्भातील शाळा १५ जुन पासुन सुरु केल्यास उष्णतेची झळ लहान मुलांना मोठ्या प्रमाणात पोहचू शकते.कारण जुन महिन्यात सुद्धा सुर्य आग ओकत असतो अशा वेळेस शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताची झळ मुलांना पोहचू शकतो.सकाळच्या पाळीत शाळा असली तरी लहान मुलांना वारंवार घाम पुसावा लागतो.त्यामुळे शिक्षण विभागाने घाई न करता शाळा २६ जुनला सुरू करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी -अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू लोहकरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!