अंतरगावच्या ग्रामसेवकाचे पौर्णिमा अमावश्येला दर्शन - गावकऱ्यांचे पंचायत समितीकडे तक्रार

 

सावली - गाव व सरकार यामधील महत्वाचा दुवा म्हणून जबाबदारी असणाऱ्या ग्रामसेवकाचे दर्शनच होत नसतील तर कामाची आशा कुणाकडे करावी असा प्रश्न अंतरगाव येथील गावकऱ्यांना येत असून पाणी पुरवठा सारख्या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांनी पंचायत समिती गाठत ग्रामसेवक राहुल रामटेके यांचेविरुद्ध तक्रारच केली आहे.

      गावाचा विकास आराखडा तयार करणे, सर्व कामाचे रेकॉर्ड लिहिणे, जन्म मृत्यू नोंदणी घेणे,पदाधिकारी व गावकऱ्यांना मार्गदर्शन करणे, कराची वसुली करणे, विविध दाखले देणे ही कामे प्रामुख्याने ग्रामसेवकांना करावी लागतात. तालुक्यातील अंतरगाव ग्रामपंचायतीत अंतरगाव टोला, भानापूर, असोला चक ही गावे समाविष्ट असून लोकसंख्या ३ हजार आहे. येथील ग्रामसेवक राहुल रामटेके नियमित ग्रामपंचायतला येत नसल्यामुळे लोकांना दाखले मिळत नाही, ४ महिन्यापासून पाणीपुरवठा ठप्प असल्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे, नालीतील गाळाचा उपसा न केल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे गावातील महिलांनी सभा घेत रोष व्यक्त करीत ग्रामसेवक रामटेके यांच्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोमलवार यांचेकडे शिष्टमंडळाने केली आहे.

अंतरगाव येथील ग्रामसेवक राहुल रामटेके हे सतत गैरहजर राहत असल्याच्या व कामात बेजबाबदाऱपने वागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आमच्या कार्यलयाकडूनही फोन केल्यास प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

 मुक्तेश्वर कोमलवार 

गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!