“मूलकरांचा विरोध धुडकावून ‘बॅकडोअर’ने मालधक्का रेटण्याचा प्रयत्न”

“मूलकरांचा विरोध धुडकावून ‘बॅकडोअर’ने मालधक्का रेटण्याचा प्रयत्न”


गावकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता, मालधक्का समर्थकांकडून आता ‘मागच्या दाराने’ प्रयत्न सुरू असल्याचे उघड होत आहे. वेगळ्या कामाच्या नावाखाली नगर परिषदेची परवानगी घेऊन प्रत्यक्षात मालधक्का सुरू करण्याचा डाव आखला जात असल्याची गंभीर शंका व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, रेल्वे स्थानकाजवळ मालसाठवणुकीच्या नावाखाली एका कंत्राटदाराने नगर परिषदेकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
मात्र, या मागणीमागील छुपा हेतू ओळखून बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी हा प्रयत्न वेळीच हाणून पाडला. विशेष म्हणजे, यापूर्वी ज्या मार्गावर झाडे तोडून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्याच मार्गावर संबंधित कंत्राटदाराने रोड रोलर आणून ठेवल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे मालधक्का उभारणीसाठी ‘चोर पावले’ टाकली जात असल्याची चर्चा आता जोर धरत आहे.
दरम्यान, मालधक्का हा मूल शहर व तालुकावासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला असून, दोन वर्षांपूर्वीचा प्रस्ताव आमदार सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्या हस्तक्षेपामुळे रद्द झाला होता. तरीही काही स्वार्थी घटकांकडून  स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मूल शहराच्या शांतता व सुरक्षिततेशी खेळ करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
मूल शहरात मालधक्का उभारण्यासाठी वाघाच्या हल्ल्याची भीती दाखवत नागरिकांकडून आडमार्गाने सह्या गोळा करण्याचा प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून जनतेची दिशाभूल करून पुढील डाव साध्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ज्या परिसरात आधीच लोहखनिज वाहतुकीचा मालधक्का कार्यरत आहे आणि जिथून मोठ्या हायवा वाहनांद्वारे धोकादायक खनिजाची वाहतूक केली जाते, त्या भागातील परिस्थिती आधीच गंभीर आहे. अशा स्थितीत, शांत व सुरक्षित असलेल्या मूल शहरालाही प्रदूषण आणि धोक्याच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न काही घरभेदी घटकांकडून केला जात असल्याची माहिती आहे.
मालधक्का सुरू करण्याच्या हालचालींची माहिती मिळताच “गुड मॉर्निंग ग्रुप”ने पुढाकार घेत ठाम विरोध नोंदवला. तसेच, मालधक्का हटाव कृती समितीच्या निवेदनाचा आदर राखत नगराध्यक्षा  एकता प्रशांत समर्थ Ekta Prashant Samarth यांनी नगर परिषदेची विशेष सभा बोलावली. या सभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने ठराव पारित करून मूल शहरात खनिज वाहतुकीसाठी मालधक्का उभारण्यास ठाम विरोध दर्शविला.
गावकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता, मालधक्का समर्थकांकडून आता ‘मागच्या दाराने’ प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. वेगळ्या कामाच्या नावाखाली नगर परिषदेची परवानगी घेऊन प्रत्यक्षात मालधक्का सुरू करण्याचा डाव आखला जात असल्याची शंका व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर, एका कंत्राटदाराने रेल्वे स्थानकाजवळ मालसाठवणुकीसाठी नगर परिषदेकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र, या मागणीमागील छुपा हेतू ओळखून बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. विशेष म्हणजे, यापूर्वी ज्या मार्गावर झाडे तोडून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच मार्गावर संबंधित कंत्राटदाराने रोड रोलर आणून ठेवल्याचेही निदर्शनास आले आहे.
यापूर्वी रेल्वे स्थानक परिसरात अनेक विकासकामे झाली असतानाही त्यासाठी कधीही नगर परिषदेची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे याच वेळी परवानगी का मागितली जात आहे, हा प्रश्न उपस्थित होत असून, थेट मालधक्का सुरू करणे शक्य नसल्याने मागच्या दाराने प्रयत्न सुरू असल्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, मालधक्का हटाव कृती समितीने आमदार मुनगंटीवार यांना निवेदन देत, मूल शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर केळझर येथे आधीच मालधक्का अस्तित्वात असल्याने नवीन मालधक्का उभारू नये, अशी मागणी केली. या मागणीला आमदार मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, कोणत्याही परिस्थितीत मूल शहरात मालधक्का होऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली.
स्थानिक भारतीय जनता पार्टी , Bharatiya Janata Party नेही तातडीची बैठक घेऊन मालधक्क्याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्या वतीने लवकरच सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, मालधक्का सुरू करण्यासाठी रचल्या जाणाऱ्या ‘चोर पावलां’च्या हालचाली नेमक्या कुठपर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण मूल तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!