Floorball -राष्ट्रीय फ्लोअरबॉल अजिंक्यपद स्पर्धा
चंद्रपूर : राष्ट्रीय फ्लोअरबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आज उद्घाटन
Floorball Association of Maharashtra यांच्या मान्यतेने व चंद्रपूर जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनतर्फे ११ वी राष्ट्रीय फ्लोअरबॉल अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष व महिला) आज मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.
ही स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, विसापूर (जि. चंद्रपूर) येथे दिनांक २ ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. देशातील सुमारे १७ राज्यांमधून पुरुष व महिला असे एकूण सुमारे ३५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचाही सहभाग असून त्यामुळे स्पर्धेचा दर्जा अधिक उंचावला आहे.
उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा. श्री. जगन्नाथ शिंदे (अध्यक्ष, ए.आय.ओ.सी.डी. मुंबई), तसेच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट व क्रीडा क्षेत्रातील इतर मान्यवरांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र फ्लोअरबॉल असोसिएशनचे राज्य सचिव मा. रविंद्र चौथावे व अन्य पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेसाठी पंच व अधिकृत प्रतिनिधी चंद्रपूर येथे दाखल झाले असून, स्पर्धा एकूण ३ दिवस चालणार आहे. उत्कृष्ट नियोजन आणि मोठ्या सहभागामुळे ही स्पर्धा राज्य व देशातील फ्लोअरबॉल खेळासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी ही स्पर्धा क्रीडा क्षेत्रात नवे पर्व ठरणार असून, स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!