पवनी नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम

तालुकास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत २३७ विद्यार्थ्यांचा सहभाग

यशस्वी विद्यार्थ्यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते गौरव;आगामी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बळ!

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.०६/०४/२०२६ आगामी मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील विद्यार्थी मागे पडू नयेत आणि त्यांचा सराव व्हावा,या उद्देशाने पवनी नगरपरिषद व गुरुकुल सी.पी.एस. क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 'तालुकास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचे' आयोजन करण्यात आले.पी.एम. श्री.नगरपालिका विद्यालयात पार पडलेल्या या परीक्षेत तालुक्यातील एकूण २३७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपला सराव सिद्ध केला.नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर यांच्या विशेष पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मक गुणांना वाव देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर,उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना नगराध्यक्षांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

हे ठरले परीक्षेचे मानकरी:
प्रथम क्रमांक: पुर्वेश संजय काटेखळे (न.प.लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळा) द्वितीय क्रमांक: योगेश दीनदयाल पचारे (न.प. लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळा) तृतीय क्रमांक:  जिग्नेश मुनेश्वर काटेकर (न.प. लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळा) चतुर्थ क्रमांक: शिरीष मानप्रकाश येलेकर (मनोसुमन पब्लिक स्कूल) पाचवा क्रमांक: साई नरेश तिघरे (बालाजी विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल)
मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याच्या व्यासपीठावर नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर यांच्यासह नगरसेवक सुरेश अवसरे, भाग्यश्री गोमासे,सोनू दंडारे,गुरुकुल क्लासेसचे संचालक रवी भिसिकर, प्राचार्य रवी बिलवणे,प्रशांत ढवळे, प्रफुल्ल वऱ्हाडे,अनिल चेटूले,दौलत मसराम,ज्ञानेश्वर शहारे,गायकवाड, कोकाटे,नवखरे,संतोष चौफाडे, भारती चवळे तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून,अशा सराव परीक्षांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!